Chalkewadi, India
Thoseghar Chalkewadi Road
N/A
Awesome place for photoshoot....
like
go in rainy season. very glorious environment and elegant place
Amazing place to enjoy view. Worth of visit.
Nice climate in rainy season. Best visit in monsoon.
गच्च हिरवाईमधून उंचावरून फेसाळत कोसळणारा पांढरा धबधबा पाहण्यास पर्यटक हजेरी लावतात ते ठोसेघरला. सज्जनगड फाट्यापासून दहा किलोमीटरवर ठोसेघर गाव आहे. लाल माती, दाट झाडी आणि घाटरस्त्यामुळे साताऱ्यापासून इतक्या जवळ असूनही आपण कोकणात असल्याचा आभास निर्माण होतो. ठोसेघर गावापासून पुढे तीन किलोमीटरवर धबधबा आहे. पावसाळ्यात सहाशे फूट उंचावरून कोसळणारे पाणी पाहण्याचा आनंद अवर्णनीय आहे. धबधबा पाहण्यासाठी खास प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला असून, छोटा आणि मोठा असे दोन धबधबे या ठिकाणी पाहायला मिळतात. अर्थात छोट्या धबधब्याजवळ जाणे धोकादायक असून, पर्यटकांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. रेलिंग लावून हा परिसर बंदिस्त करण्यात आला आहे. साताऱ्यापासून ठोसेघरचे अंतर २६ किलोमीटर आहे. ठोसेघरपासून पुढे चार किलोमीटरवर चाळकेवाडी पठार आहे. येथे प्रचंड वेगाने वारे वाहतात, हे लक्षात घेऊन सुमारे १५०० पवनचक्क्या उभारण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात या पठारावर अनेक सपुष्प वनस्पती फुलतात. त्यातील काही वनस्पती प्रदेशनिष्ठही आहेत.
Deli
The best companies in the category 'Deli'